India House : लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

13 Nov 2025 15:16:00
 
India House
 
मुंबई : (India House) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले लंडन येथील इंडिया हाऊस (India House), महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार असून, त्याचे स्मारक म्हणून जतन करेल अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली.
 
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकराच्या रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन (India House) दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला (India House) भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थीत भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी याबाबत मंत्रालय दालनात आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.
 
 हेही वाचा : संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार
 
या बैठकीत "मित्रा"च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ (India House) ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण मांडण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0