मुंबई : (Delhi Bomb Blast) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटानंतर, आता सुरक्षा यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. शिवाय या स्फोटाचा थेट संबंध जम्मू-काश्मीरसोबत असल्याचा संशय वर्तवला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी तब्बल ५०० ठिकाणी छापेमारी करत ६०० जणांना ताब्यात घेतले आहे. तपास यंत्रणांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरूद्ध करण्यात आली आहे. या संघटनेने पुन्हा सक्रिय होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हे थांबवण्यासाठीच ही मोहिम आखल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Delhi Bomb Blast)
हेही वाचा : Delhi Blast : ६ डिसेंबर, ६ ठिकाणं... असा रचला होता कट, दिल्ली कार स्फोटामागं 'बाबरी' कनेक्शन! नेमकी काय माहिती समोर आली?
दहशतवादी डॉक्टर मॉड्यूलविरोधात करण्यात आलेल्या या कारवाई, श्रीनगर, कुलगाम, पुलवामा, शोपियां आणि बारामुल्ला या जिल्हांमध्ये मोठ्याप्रमाणात छापेमारी करण्यात आली. तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती माध्यमांकडून मिळत आहे. (Delhi Bomb Blast)
दरम्यान, संशयितांच्या चौकशीतून असे दिसून आले आहे की, त्यापैकी काही जण गेल्या वर्षभरात तुर्कीलाही गेले होते. स्फोटकांचा मोठा साठा जप्त केल्याप्रकरणी डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर “व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल” शी संबंधित तपासकर्त्यांनी आतापर्यंत २०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. (Delhi Bomb Blast)