इतिहासात ‌‘अब्राहमिक‌’ धर्माच्या अनुयायांकडून जगभरात हिंसा

13 Nov 2025 13:07:39

delhi bomb blasts
 
मुंबई : ( Delhi bomb blasts ) दि. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटातील कारचे पुलवामा कनेक्शन आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल समोर आले. दिल्ली स्फोटाने हादरण्यापूव दिवसभरात तीन राज्यांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 हजार, 900 किलो स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जप्त केली होती. तीन डॉक्टरांसह दहशतवादी संघटनांशी संबंधित आठजणांना अटक केली होती. पाच ते सहा दिवसांपूव ‌‘गुजरात एटीएस‌’ने ‌‘रायजिन‌’ नावाच्या विषाच्या माध्यमातून भयंकर रासायनिक हल्ल्याचा कट उधळून लावला होता. जगभरात आजवर झालेल्या हिंसक कारवाया अब्राहमिक धर्माच्या अनुयायांकडून झाल्याचे इतिहास सांगतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन मोठ्या धर्मांचा उगम अब्राहम (इब्राहीम) या व्यक्तीकडे आहे, असे मानला जाते. त्यामुळे या तिन्ही धर्मांना अब्राहमिक धर्म असे म्हणतात.
 
यातील कोणाही गरीब नाही अन्‌‍ अशिक्षितही नाही
 
स्फोटाचा मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी हा स्फोटाच्या दिवशी स्फोटकांनी भरलेले वाहन चालवत होता. सहा डॉक्टरांना (डॉ. उमर उन नबी, डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. शाहीन शाहिद, डॉ. आदिल अहमद, डॉ. परवेज अंसारी, डॉ. निसार उल हसन) अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे. हे दहशतवादी गरीब, अशिक्षित किंवा बेरोजगारीतून जन्माला आलेले नाहीत, हे उच्चशिक्षित परंतु जिहादी मानसिकतेतून आले आहेत. या प्रकरणात उघड झालेला दहशतवादी गट हा सर्वसामान्य सशस्त्र दहशतवाद्यांचा नसून, व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल म्हणजेच उच्चशिक्षित, समाजात प्रतिष्ठित मानले जाणारे डॉक्टरांचा गट असल्याचे समोर आले आहे. यातून दहशतवादाचा परिस्थिती किंवा शिक्षणाशी काहीही संबंध नसतो, हे आधीही सिद्ध झाले आहे.
 
‌‘त्या‌’ कारचा फरिदाबाद - पुलवामा-फरिदाबाद प्रवास
 
स्फोटात छिन्नविछिन्न झालेली कार हरियाणा पासिंगचीच निघाली. या कारचा जुना मालक मोहम्मद सलमान याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. सलमानने दीड वर्षांपूव ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर देवेंद्रने ती हरियाणाच्या अंबाला येथील नदीम खानला विकली. नदीम खानकडून तारीक नावाच्या व्यक्तीने ती रॉयल कार झोन हरियाणा येथून दि. 29 ऑक्टोबर रोजी खरेदी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तारीक मूळचा पुलवामाचा आहे; पण तो फरिदाबादमध्ये राहात होता.
 
भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचे प्रेरणास्थान धार्मिकच
 
गेल्या काही काळात इस्लामिक दहशतवादाने भारतात पुन्हा डोके वर काढले आहे. फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर अब्राहमिक धर्माच्या अनुयायांकडून जगभरात हिंसक कारवाया घडलेल्या आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे अब्राहमिक धर्मांची विस्तारवादी व असहिष्णु वृत्ती. या वृत्तीचे मूळ असलेल्या धार्मिक ग्रंथातच जगाची विभागणी आपण व इतर अशी असल्याने यांची उपस्थिती असलेल्या प्रत्येक ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला दिसतो. जगभरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांची नावे पाहिली, तर ‌‘अल बद्र‌’, ‌‘अल कायदा‌’, ‌‘लष्कर-ए-तोयबा‌’, ‌‘हिजबुल्ला‌’, ‌‘ब्रिगेड 313‌’ अशी धार्मिक आधार असलेली आहेत. भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचे प्रेरणास्थान धार्मिकच असून या कारवायांसाठी आवश्यक असलेले पैसे अमली पदार्थांचा व्यापार, इतर अवैध धंदे यांतून उभे केले जातात. स्थानिक तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना काफिरांविरोधात ‌’जिहाद‌’ करण्यासाठी उद्युक्त केले जाते. त्यांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असलेल्या या युद्धात सहभागी झाल्याने आपल्याला ‌‘जन्नत‌’ मिळेल, अशी खात्री असलेले हे माथेफिरू निर्ममपणे निरपराध नागरिकांचा बळी घेतात.
- तुषार दामगुडे, ॲण्टी टेरर फोरम, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
इस्लामिक दहशतवादाइतकाच शहरी नक्षलवाद घातक
 
दि. 10 नोव्हेंबर रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण दिल्ली हादरली. 12 निरपराध लोक बळी गेले.़ 24 जण जखमी झाले आणि मृतांचा हा आकडा वाढूही शकतो. सदर हल्ला इस्लामी कट्टरतावादी अतिरेकी हल्ला होता, हे आता सिद्ध झाले आहे. पण तरीही समाजमाध्यमांवर तथाकथित लिब्राडू आतंकवादाला धर्म नसतो, असा कंठशोष करत आहेत.
पकडलेल्या अतिरेक्यांकडे ज्या प्रकारची स्फोटके मिळाली, ते पाहता, केवढ्या मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचे षड्‌‍यंत्र होते, याची कल्पना करू शकतो. हल्ल्याबाबत शासन, प्रशासन, तपासयंत्रणा आणि पोलीस दल योग्य ती कारवाई करतीलच. पण याइतकेच महत्त्वाचे म्हणजे, शहरी नक्षलवादाकडेदेखील तपासयंत्रणांनी बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण, या अतिरेक्यांबाबत पोकळ सहानुभूती दाखवणारे तथाकथित सेक्युलरवादी हेसुद्धा अतिरेक्यांचे साथीदार आहेत, असे समजून त्यांच्याबाबतही कठोर धोरण अवलंबले पाहिजे.
 
- मोहन सालेकर, प्रांतमंत्री, विश्व हिंदू परिषद, कोंकण प्रांत
दहशतवादी केवळ एकाच धर्माचा का असतो?
 
दहशतवाद्यांना फक्त एकच संधी पुरेशी असते. आपल्या एजन्सींनी वेळेवर कारवाई केली नसती, तर आज दिल्लीमध्ये फार मोठा नरसंहार झाला असता. एवढे होऊनही आता अनेक बुद्धिजीवी गांडूळे वळवळतील, ‌‘या प्रकरणाला सांप्रदायिक रंग देऊ नका,‌’ असं सांगत विव्हळतील. ते म्हणतील, ‌‘दहशतवादाला धर्म नसतो.‌’ नसेलही! पण जगभरातला प्रत्येक दहशतवादी केवळ एकाच धर्माचा का असतो? आजच्या परिस्थितीत कोणी ‌‘शांततेचा धर्म‌’ म्हणून इस्लामचं तुष्टीकरण करत असेल, ‌‘गंगा-जमुनी तहजीब‌’चं खोटं गाणं गात असेल, तर ती व्यक्ती निःसंशय खोटे बोलत आहे, हे लक्षात असू द्या.
 
- शेफाली वैद्य, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती
 
 
Powered By Sangraha 9.0