मुंबई : (AI) पत्रकारांसाठी ‘एआय’चे (AI) प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम असून ‘एआय’मुळे (AI) पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त होणार आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘एआय’ (AI) तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला मंत्री लोढा यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्यासह प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "जगभरात आता विविध क्षेत्रात ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ‘एआय’ (AI) तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे हे लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला आहे. नवनवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नेहमीच मनुष्यबळासंदर्भात चर्चा होते. मात्र या तंत्रज्ञानाने (AI) अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील. पत्रकारांना या कार्यशाळेचा दैनंदिन कामकाजात नक्कीच अधिक उपयोग करता येईल तसेच कामामध्ये अधिक तंत्रस्नेहीपणे काम करता येईल," असे ते म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....