मुंबई : (Suburban railways) छत्रपती शिवाची महाराज टर्मिनस, मुंबई येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी (Suburban railways) आंदोलन केले. मुंब्रा दुर्घनेत जीआरपीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात सीएसएमटी स्थानकात आंदोलन करण्यात आले. मात्र, मुंबईत संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे (Suburban railways) प्रवाशांचा खोळंबा झाला. दीड तासाच्या रेल रोको नंतर ट्रेन सुरु झाल्यावर गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनची धडक बसून दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेला ७ दिवस उलटून देखील मध्य रेल्वेचा (Suburban railways) अहवाल प्रतिक्षीत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकल रेल्वे प्रवासी संघाचे सचिव सिद्धेश देसाई यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
प्रश्न १ : आंदोलन सुरु होताच तुम्ही धोक्याची शंका उपस्थित केली होती. तरीही रेल्वे प्रशासनाकडून (Suburban railways) कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. याकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : साधारण संध्याकाळी सहाच्या आसपास आम्हाला या आंदोलनाची माहिती मिळाली. रेल्वे स्थानकानावर (Suburban railways) होणारी गर्दी आणि यावेळी प्रवाशांची असणारी गर्दी लक्षात घेता सात वाजण्याच्या सुमारास आम्ही ट्विट करून रेल्वे प्रशासनाला सतर्क केले होते की, यामध्ये काही दुर्घटना झाली किंवा कोणाला अपघात झाला तर याला सर्वस्वी या रेल्वे संघटना (Suburban railways) जबाबदार असतील. उदाहरणार्थ, कोणी रुग्ण व्हेंटिलेटर वर असेल, खूप आजारी असेल आणि कोणी त्याचा ऑक्सिजन बंद केला. तर त्याचा मृत्यू होईल. तेव्हा रुग्णालय असे नाही म्हणू शकत कि माझी काय चूक यात, त्याचा ऑक्सिजन बंद झाला आणि तो मेला. त्यामुळे जे दोन अपघाती मृत्यू झाले आणि काही लोक जखमी झाले याला केवळ त्यादिवशी झालेलं आंदोलनच जबाबदार आहे.
रेल्वे प्रशासनाने (Suburban railways) ट्रॅकवरून पायी चालणाऱ्या प्रवाशांना यासाठी जबाबदार धरले आहे. मात्र, एक लक्षात घेतलं पाहिजे. १ तास ट्रेन बंद होत्या. यादरम्यान सीएसएमटी स्थानकात आंदोलन सुरु असल्याने ट्रेन बंद असल्याची कोणतीही घोषणा रेल्वे प्रशासनाने (Suburban railways) केली नाही. त्यामुळे गोंधळलेली लोक उतरून ट्रॅकवरून चालू लागले. यात आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे, ही लोक ट्रेनमधून पडली की ट्रॅकवरून चालत जात होती, यांचा कोणताही खुलासा झालेला नाही. ट्रेन बराच वेळ मध्येच थांबल्या आहेत तर लोकांना चालत फलाटाकडे निघतातच ना? त्याच्याकडे दुसरा पर्यायच काय उरतो? एक ते दोन तास ट्रेन एकाच जागेवर थांबून आहे, त्यांना कोणतीही माहिती देण्यात येत नाही यावेळी प्रवासी गोंधळतातच, यात प्रवाशांचा दोष काय आहे?
प्रश्न २ : अनेकदा ट्रेन एरव्ही देखील प्रवास दरम्यान बराच काळ मध्येच थांबतात. अशावेळी कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत. याबाबत काही ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता वाटते का?
उत्तर : या सगळ्या समस्यांचे मूळ हे आहे की, रेल्वे प्रशासनाला (Suburban railways) अजूनही भान नाहीये की ते उपनगरीय रेल्वे सेवाही देतात. त्यांना वाटते ते केवळ लांब पल्ल्याच्या गाड्याच चालवतात. जर आपण जीएम डीआरएम जे येतात त्यांनाही लोकलचा अनुभवच नसतो. म्हणजे यांच्या महिनाभरात जेवढ्या गाड्या सुटतात तेवढ्या गाड्या लोकलच्या मुंबईत एका तासात सुटतात. त्यामुळे या दोन्हींचे प्रकार वेगवेगळे आहेत. जर विमान चालविणाऱ्या व्यक्तीला मी जहाज चालवायला दिले आणि सांगितले की दोन्ही ही चालणारच आहेत ना! मग चालवं. हा तसाच प्रकार आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई नावाचे एकच प्राधिकरण असावे जे या सर्व रेल्वे (Suburban railways) एकत्रित सांभाळेल. कारण रेल्वे मध्येही पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर अशा अनेक सेवा आहेत. इतक्या सेवा असल्यावर वेगळे प्राधिकरण असणे आवश्यकच आहे. हेच प्रशासकीय निर्णय क्षमता नसल्याचे एक मुख्य कारण आहे. मुंबई लोकलचे सर्व निर्णय हे केंद्राच्या अखत्यारीत म्हणजेच दिल्लीत घेतले जातात. मुंबई जर आर्थिक राजधानी आहे तर मुंबईचे निर्णय हे मुंबईतच घेतले जावे अशी आमची मागणी आहे.
प्रश्न ३ : इतकी मोठी दुर्घटना घडून गेल्यावरही मध्य रेल्वे प्रशासनातून कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आली नाही. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या एफआयआरमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे याचा. याकडे रेल्वे प्रवासी संघटना कसे बघते?
उत्तर : मुंब्रा येथील रेल्वे अपघात घडल्यापासून मध्य रेल्वेची (Suburban railways) भूमिका अत्यंत संशयास्पद अशीच राहिलेली आहे. प्रवाशांचा मृत्यू झाला की तो प्रवाशांवर ढकलून दिला जातो. दोन ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅग एकमेकांना अडकून किंवा एखाद्या प्रवाशाची बॅग रेल्वेला लागली म्हणून रेल्वेच्या आतील आणि बाहेरील प्रवाशी जखमी झाले किंवा मृत पडले. मुंब्रा अपघात हा दोन ट्रेन एकमेकांना घासल्या जाऊन झालेलाच अपघात आहे. मात्र हे सर्व प्रकरण दाबण्यासाठी हे सर्व सुरु झालेलं आहे. आताही जो गुन्हा दाखल झालेला आहे, यासाठी तपास करण्यात जीआरपीला रेल्वे प्रशासनाकडून (Suburban railways) सहकार्य करण्यात येत असल्याचे आमच्या कानावर आणि वाचण्यात येत आहे. सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील एका प्राधिकरणाने या प्रकरणाचा तपास करावा अशी आमची मागणी आहे. या मागणीवर अजून कोणताही निर्णय आलेला नाही. हे पाहता उपनगरीय रेल्वे (Suburban railways) सेवा चालविण्यासाठी जे नेतृत्व हवं ते मुंबईतच असायला हवे आणि महाराष्ट्र राज्य सरकाराच्या अखत्यारीत असायला हवे.
प्रश्न ४ : एका आंदोलनातून इतकी मोठी दुर्घटना घडते. हे पाहता भविष्यात अशा आंदोलनाला परवानगी देताना कोणती खबरदारी घेतली जावी असे वाटते?
उत्तर : भविष्यात रेल्वे प्रशासन (Suburban railways) काय करणार ही खूप लांबची गोष्ट आहे. मात्र ज्या घटना आत्ता घडल्या आहेत त्यावरही यांनी कठोर कारवाई करायलाच हवी. रेल्वे प्रशासनाने हे आंदोलन झाले तेव्हाच ईस्माअंतर्गत कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम नेमका कशासाठी आहे? बँकेच्या लोकांनी सांगितलं की, आम्ही पैसे देणारच नाही. रुग्णालयात आंदोलन होते तेव्हा पूर्ण सेवा बंद ठेवता येत नाही हा या कायद्याचा धाक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.