Local body election नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूकीच्या तयारीला वेग

12 Nov 2025 15:41:59
 
 Local body election
 
मुंबई : (Local body election) आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी (Local body election) भाजपच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
 
येत्या २ डिसेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा (Local body election) आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक (Local body election) होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायूतीतील घटक पक्षांनी शक्य तिथे यूतीतच निवडणूक (Local body election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाविकास आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
हेही वाचा : ब्रिटिश साम्राज्यनिर्मितीचा इतिहास
 
दरम्यान, आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकांसाठी (Local body election) भाजपने आपले स्टार प्रचारक घोषित केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक चव्हाण, खा. नारायण राणे, महामंत्री शिवप्रकाश यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांचा समावेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0