मुंबई : (Local body elections) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून नुकतीच मुंबई भाजपच्या सरचिटणीस पदांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बुधवारी या नियूक्त्या जाहीर केल्या. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या सरचिटणीस पदांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, भाजप नेत्या श्वेता परुळकर आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांची भाजप मुंबईच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकट
"संघटनेने ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मी वॉर्डाचा प्रसिद्धीप्रमुख होतो. मी एका सामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराच्या घरातील मुलगा असून माझ्यावर ही जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. पक्षसंघटना आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुथ सशक्तीकरण, प्रत्येक वस्तीमध्ये आणि प्रत्येक बिल्डींगमध्ये एक प्रमुख या पद्धतीने काम करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. यासोबतच महायुतीच्या लोकांमध्ये समन्वय करून यूती मजबूत करणे तसेच अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर युतीचा महापौर बसवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे."
- राजेश शिरवडकर, नवनियुक्त सरचिटणीस तथा भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष