धर्मेंद्रंच्या निधनाच्या अफवांदरम्यान मुंबईतील घराची सुरक्षा वाढवली, कारण काय?

    11-Nov-2025
Total Views |


मुंबई : हिंदी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृती अतिशय नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. गेले काही दिवस धर्मेंद्र यांची तब्येत खालावलेली आहे. तर आज (११ नोव्हेंबर) ला त्यांच्या निधनाच्या अफवेने मोठी खळबळ उडवली होती. मात्र देओल कुटुंबियांनी या सगळ्या अफवा असून धर्मेंद्र सुखरुप असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेकीखाली ठेवण्यात आले आहे. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचं सातत्याने निरीक्षण करत आहे. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयातत दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

धर्मेंद्र यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल, मुलगा बॉबी देओल हे त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. तसेच काल रात्रीपासून अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांची भेट देखील घेतली. दरम्यान, आता धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवल्याचे चित्र दिसत आहे. धर्मेंद्र यांचा जुहू येथे आलिशान बंगला आहे. या बंगल्याची नेहमीच चर्चा होत असे. आता धर्मेंद्र रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली असल्याचे दिसत आहे. आज सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा परसल्या होत्या. मात्र, मुलगी ईशाने यावर प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.


सध्या धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्त संस्थेने धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर धर्मेंद्र यांचे चाहते निरनिराळ्या कमेंट्स देखील करताना दिसत आहेत.