मुंबई : (vijay wadettiwar) काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसंदर्भात सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले कि, "आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवले आहे, आम्ही ही निवडणूक स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे कोणाला किती जागा मिळतील, हा प्रश्न निर्माण होत नाही. शिवाय, हा निर्णय स्थानिक पातळीवर हाय कमांडशी चर्चा करून घेण्यात आला आहे."
हेही वाचा : अजिंक्य नाईक दुसऱ्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी! निवडणुकीत बिनविरोध निवड
"निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. जिंकणे हा आमचा उद्देश नाही, पण कार्यकर्त्यांना न्याय देणे आणि त्यांना निवडणूक लढण्याची संधी देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे," असेही वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले.
त्याबरोबरच, "निवडणुकांना अजून वेळ आहे. जर समविचारी पक्षांकडून निवडणुकीत एकत्र येण्याचा प्रस्ताव आला, तर आम्ही नक्कीच विचार करू," असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (vijay wadettiwar)