
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या पोस्टमध्ये म्हटले आहे कि, "आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या."
"ही नियुक्ती पक्षाच्या सशक्त संघटनात्मक रचनेत एक महत्त्वाचा टप्पा असून, राज्यभरात पक्षाची विकासाभिमुख विचारधारा प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही पावले अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सर्व नवनियुक्त प्रवक्त्यांकडून पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची विचारधारा सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नवीन प्रवक्ते कोण ?
अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
सना मलिक
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत तरंगे