Delhi Blast Near Red Fort : दिल्लीत कारमध्ये मोठा स्फोट, तीन वाहनांना आग; काही जण जखमी झाल्याची भीती

10 Nov 2025 19:19:34

Delhi Blast Near Red Fort

 
मुंबई : (Delhi Blast Near Red Fort) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कार जळून खाक झाली असून, जवळच्या इतर तीन कारही आगीच्या झपाट्यात आली आहेत. या घटनेमुळे लाल किल्ला परिसरात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
 

हेही वाचा : NCP : रुपाली ठोंबरेंसह अमोल मिटकरींना देखील धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर


 
आतापर्यंत माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाकडून सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Delhi Blast Near Red Fort)
 

दरम्यान, ही घटना लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ घडली असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. हा गर्दीचा परिसर आहे, जिथे संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. हा स्फोट कारमधील सीएनजी गळतीमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि सर्व बाजूंनी तपास करत आहेत. शिवाय, स्फोटाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. (Delhi Blast Near Red Fort)
 

 
Powered By Sangraha 9.0