अजिंक्य नाईक दुसऱ्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी! निवडणुकीत बिनविरोध निवड

10 Nov 2025 16:36:13
 
Ajinkya Naik
 
मुंबई : (Ajinkya Naik) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी शरद पवार गटाचे अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडणुकीतील उमेदवार भाजप नेते प्रसाद लाड, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, डायना एडल्जी यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने त्यांची निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांची ही निवड झाली आहे.अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत चुरस होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांना पुन्हा अध्यक्षपद मिळाले आहे.

अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. मात्र कार्यकारिणीच्या इतर पदासाठींच्या निवडणुका १२ नोव्हेंबरला होणार आहेत. उपाध्यक्षपदासाठी ९, सचिवपदासाठी १०, सहसचिवपदासाठी ९ आणि खजिनदार पदासाठी ८ अर्ज आले आहेत. त्याचबरोबर कार्यकारिणी पदासाठी ४८ अर्ज आले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0