Sikander Sheikh : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक

01 Nov 2025 17:03:21
Sikandar Shaikh
 
मुंबई : (Sikander Sheikh) पंजाबच्या मोहाली येथे सीआयए पथकाने महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख (Sikander Sheikh) याला चार शस्त्र तस्करांसह अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून १.९९ लाख रुपये रोख, एक .४५ बोर पिस्तूल, चार .३२ बोर पिस्तूल, काडतुसे आणि दोन स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सिकंदर (Sikander Sheikh) हा हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या पपला गुर्जर टोळीसाठी काम करत असल्याचे उघडकीस आले आहे.
 
हेही वाचा :  एशियाटिक सोसायटीच्या सत्तेसाठी राजकारण करणार्‍यांना दणका!
 
या कारवाईमुळे पपला गुर्जर टोळीच्या शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश झाला आहे. सिकंदर (Sikander Sheikh) बरोबरच उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील छाता गावचे दानवीर वय(२६), बंटी वय(२६) आणि नाडा नयागाव येथील कृष्ण उर्फ हॅप्पी गुर्जर (२२) यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरुद्ध थाना सदर खरड येथे आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलीस रिमांड दरम्यान असे समोर आले की दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये यापूर्वीच खुनाचे दोन, दरोडा, आर्म्स ऍक्ट आणि एटीएम तोडण्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी दानवीर हा पपला गुर्जर टोळीचा सदस्य आहे. आरोपी दानवीर, बंटी आणि सिकंदर शेख (Sikander Sheikh) यांना शस्त्रे देतानाच मोहालीच्या एयरपोर्ट चौकातून अटक करण्यात आली.
 
हे वाचलात का ? : JNU : 'जेएनयू'त अभाविपचे शक्ती प्रदर्शन, मशालींच्या प्रकाशात दुमदुमला “भारत माते'चा जयघोष
 
सिकंदर शेख (Sikander Sheikh) सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ येथील आहे. तो आर्मीमध्ये खेळाडू कोट्यातून भरती झाला होता, मात्र नंतर त्याने नोकरी सोडली. गेल्या पाच महिन्यांपासून तो पंजाबमधील मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याने राहत होता.
 
 
Powered By Sangraha 9.0