मुंबई : (Satyacha Morcha) प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याने उपचारासाठी डॉक्टरांनी शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊतांना सार्वजिक ठिकाणी जाण्यास निर्बंध घातले आहेत. महाविकास आघाडीच्या दि. १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चात (Satyacha Morcha) राऊत सहभागी होणार नाहीत. मात्र, त्यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे या मोर्चाला (Satyacha Morcha) समर्थन दिले आहे. हा मोर्चा ऐतिहासिक, क्रांतिकारक आणि निर्णायक ठरणार आहे! महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवली, ठिणगी पडताना दिसत आहे, अशी पोस्ट त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे केली आहे.
एक दिवसापूर्वीच खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आपण सार्वजनिक जीवनातून काही काळ विश्रांती घेत असल्याचे सांगितले. संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झाल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. येत्या नवीन वर्षांत ठणठणीत बरा होऊन भेटेन, आपले प्रेम व आशीर्वाद राहूद्या, अशी पोस्ट त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी सदीच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
काळजी घे काका!
आमदार आदित्य ठाकरेंनीही काळजी घे काका म्हणत प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे!, अशी एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनीही राऊतांना एक्स पोस्टद्वारे प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या आहेत.