Satyacha Morcha : काँग्रेसला राज ठाकरे नकोसे? मोर्चातूनही पक्षचिन्ह, झेंडे गायब!

01 Nov 2025 14:15:05
Satyacha Morcha) व्होटचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी उचलून धरल्यानंतर महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील नेते दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय या परिसरात काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चाला (Satyacha Morcha) काँग्रेसने पक्ष म्हणून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणूकांमध्ये मनसे सोबत जाण्याचा संभाव्य फटका बसू शकतो, हे लक्षात घेता पक्षनेतृत्वाने ही खेळी खेळल्याचे दिसून येत आहे.
 
मुंबई : (Satyacha Morcha) व्होटचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी उचलून धरल्यानंतर महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील नेते दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय या परिसरात काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चाला (Satyacha Morcha) काँग्रेसने पक्ष म्हणून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणूकांमध्ये मनसे सोबत जाण्याचा संभाव्य फटका बसू शकतो, हे लक्षात घेता पक्षनेतृत्वाने ही खेळी खेळल्याचे दिसून येत आहे.
 
हेही वाचा :  मोर्चावरून महाविकास आघाडीतील मतभेद उघड
 
महाविकास आघाडी म्हणून ‘सत्याचा मोर्चा’ (Satyacha Morcha) ला खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अनुपस्थित राहिले आहेत. मात्र, माजी काँग्रसे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि अन्य नेते उपस्थित आहेत. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्षाचे झेंडे या मोर्चात फिरवण्यास मनाई करण्यात आली आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या महापालिका निवडणूकीत होणाऱ्या मतदानापूर्वी मतदार याद्यांतील घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी राज आणि उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच याच निवडणूकीत एकत्र लढणार असल्याची घोषणा दोन्ही बंधूंनी आपआपल्या स्तरावर केली आहे. मात्र, काँग्रेसचा मविआत मनसेला घेण्यास विरोध आहे.
 
काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी महापालिकेत आपण स्वतंत्र लढणार आहोत, अशी भूमिका घेत ठाकरे बंधूंना धक्काच दिला आहे. मनसेला मविआत आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्सुक आहेत. मात्र, याचा फटका बिहारच्या निवडणूकीत बसू शकतो. परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या पक्षासोबत आम्हाला जायचे नाही, संविधान न मानणाऱ्यांसोंबत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेत मनसेला काँग्रेसने काही दिवसांपूर्वी विरोध केला होता. त्याचाच प्रत्यय पुन्हा सत्याचा मोर्चात दिसून येत आहे.
 
हे वाचलात का ? :  मिरच्या का झोंबतात?
 
आम्ही असताना झेंड्यांची काय गरज?, नेत्यांचा अजब दावा
 
आम्ही इथे स्वतः उपस्थित असताना झेंड्यांची गरज काय?, असा अजब दावा काँग्रेसच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नांवर नेत्यांची भंबेरी उडल्याचे दिसून आले. काँग्रेस अलिप्त राहण्याचा फटका, आणि दुटप्पी भूमिकेचा फटका येत्या निडवणूकीत महाविकास आघाडीला बसणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0