पंढरपूर : (Pravin Darekar) श्री संत मोरे माऊली महाराज सेवा समिती महाराष्ट्र संचलित श्री संत मोरे माऊली संस्थांन, पंढरपूर यांच्यावतीने आज शनिवारी भव्य मंदिर उदघाटन, समाधी स्थापना, भक्त निवास भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपा गटनेते आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या शुभ हस्ते भक्त निवासचे भूमिपूजन पार पडले.
या प्रसंगी प. पू. दादा महाराज मोरे माऊली, आमदार समाधान अवताडे, माजी उपसभापती चंद्रकांत कळंबे, सायली प्रविण दरेकर, डॉ.यश प्रविण दरेकर, कृष्णकांत दरेकर, सुभाष दरेकर यांसह मंदिर समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने भक्त गण उपस्थित होते.
हेही वाचा : Maulana Fazlur Rehman : मौलाना फजलुर रहमान यांची आसिम मुनीरला चपराक
यावेळी बोलताना आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले कि, प. पू. दादा महाराज मोरे माऊली यांच्या हातून संप्रदायाचे व्रत पुढे न्यायचे आहे. ज्या समाजाला प्रबोधन करत, साधू संतांचा वारसा सांगत दादा महाराज यांचे विचार आपल्या पाठीशी असतात. पंढरपूर सारख्या नगरीत आपले स्वतःचे, आपल्या संस्थांनाचे स्थान, भक्तांसाठी चांगले निवासस्थान अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम येथे होताहेत. संप्रदायाचा एक भाग म्हणून मी नेहमीच सोबत असेन. सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करत असताना आपल्या साधू संतांचा आशीर्वाद प्रेरणा, ताकद आणि ऊर्जा देतो. येणाऱ्या काळात आपल्या तालुक्याच्या, परिसराच्या विकासासाठी जेजे आवश्यक असेल ते निश्चितपणे करू, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी दिला. तसेच संप्रदायाच्या माध्यमातून कोकणच्या भक्तगणांचे एक आदराचे स्थान निर्माण व्हावे यासाठीही काम करू, असेही दरेकरांनी (Pravin Darekar) यावेळी म्हटले.