मिरच्या का झोंबतात?

    01-Nov-2025
Total Views |
Sanjay Raut
 
 
राज्यसभेच्या पुण्यातील खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा नमाजपठण प्रकरणी अलीकडेच आक्रमक भूमिका घेतली, तेव्हा अनेकांना मिरच्या झोंबल्या. ज्यांना पुण्याचा इतिहास-भूगोल काहीच माहीत नाही, अशांचीदेखील कोल्हेकुई सुरू झाली. तिकडे नितेश राणे यांनी हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेतली की, लगेच विरोधकांना राष्ट्रीय ऐक्य धोक्यात असल्याचा साक्षात्कार होतो. शरद पोंक्षे यांनी सावरकरांबद्दल आपले प्रखर आणि सत्य मत मांडले की, अनेकांच्या पोटात दुखायला लागतं आणि नको ती गरळ ओकली जात असते. मात्र, तिकडे बालबुद्धी असलेले राहुल गांधी सावरकरांबद्दल काहीबाही बोलत असतात, तेव्हा या लोकांची तोंडे गप्प असतात? त्या एमआयएम पक्षाचा एक खासदार अहिल्यानगरातून आणि संभाजीनगरातून योगी आदित्यनाथांबद्दल काहीबाही बरळतो, तेव्हा सगळे बिळात जाऊन लपतात. तेव्हा या लोकांची राष्ट्रीय अस्मिता सोयीस्कररित्या विसर पडलेली असते. हे सर्व सांगण्याचे कारण एवढेच की, या लोकांना आता पुन्हा एकदा मिरच्या झोंबल्या आहेत.
 
राज्यातील सर्व शाळांत संपूर्ण ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ म्हणण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकण यांनी दिले आहेत. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ गीताच्या 150व्या वर्षपूतनिमित्त ठाणे येथील ‌‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट‌’द्वारे शिक्षण विभागाला पत्र दिले होते. त्याची दखल घेत शासनाकडून आजपासून दि. 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ गीताच्या सगळ्या कडव्यांचे गायन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लगेच नेहमीप्रमाणे सपाचे अबू आझमी यांनी मिरच्या झोंबल्यागत प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी याला विरोध दर्शविला. काय, तर म्हणे, सक्ती मागे घ्या! मात्र भाजपने त्यांना प्रत्युत्तर देत, पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे. बंकिमचंद्र चॅटज रचित ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून सर्व शाळांच्या दर्शनी भागात या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन लावण्याच्यादेखील सूचना दिल्या आहेत. आता अबू आझमी आणि त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना मिरच्या झोंबण्याचा त्रास होत असेल, तर त्याला कोण काय करणार?
 

कोंबडं का झाकलं?
 
हा राजकीय सल्ला आहे का? काळजी घ्या, सक्तीची रजा आहे का? पत्रकारांचे काय होणार?” असे एक ना अनेक प्रश्न संजय राऊत या उबाठा गटाच्या खासदाराने जाहीर केलेल्या भूमिकेवर उपस्थित केले जात आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि ऐन त्याचवेळी त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेल्या या नेत्याची आजारपणामुळे घ्यावी लागणारी विश्रांती यावर अनेक तर्क-वितर्क आता लढविले जाऊ लागले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून न चुकता माध्यमांसमोर दिसणारा हा नेता आता छोट्या पडद्यावर दिसणार नाही, ही रूखरूख अनेकांना राहील, यातदेखील शंका नाही. यापूवदेखील वेध घेताना राज्यातील एक गद खेचणारा नेता भोंगे बंद करायला निघाला आणि भलतेच भोंगे बंद करू लागला, म्हणून अधोरेखित केले होते. आज एक पत्रक जाहीर करून राज्यातच नव्हे, तर जगातच कुख्यात ठरलेल्या एका भोंग्याने आपण दोन महिने गंभीर आजारामुळे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेणार असल्याने भेटणार नसल्याचे चक्क जाहीर करून टाकले आणि अर्थातच समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया आणि मीम्सचा पाऊस पडला.
 
यंदा निसर्गाचा पाऊस सामान्यांना जेरीस आणत आहे आणि माध्यमांवरील पोस्टवर नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस मनोरंजन करीत असतो, हे नित्याचे झाले असताना, हा भोंगादेखील अलीकडील काळात मनोरंजनच करीत होता. ना त्याला वैचारिक अधिष्ठान होते, ना कोणता अर्थ. निव्वळ थट्टेचा विषय झालेल्या या भोंग्याने चक्क ब्रेक घ्यावा, तोदेखील त्याच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या अर्थात (उबाठाच्या दृष्टीने) मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर? हे नक्कीच काहीतरी गंभीर मानायलाही वाव आहे. ते खरेच असलेल्या गंभीर आजारातून लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा आहेतच, मात्र ज्या काही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यादेखील दुर्लक्षून कशा चालतील? ऐनवेळी हे कोंबडं का झाकलं? हे अनेकांना कळेनासे झालेले दिसते. अर्थात, यातून त्यांच्या बोलण्याला इतर नव्हे, तर त्यांच्या स्वगृहातील, पक्षातील मित्रांमधील, हितचिंतकांमधील कितीतरीजण कंटाळले होते, हेच या ‌‘ब्रेक‌’ घेण्याच्या निर्णयातून ध्वनित होते. बाकी राऊतांनी पक्षीय चिंता त्यागून आता तब्येतीची तेवढी काळजी घ्यावी! गेट वेल सुन!
 
- अतुल तांदळीकर