ओडिशा राज्याच्या स्टॉलने वेधले परीक्षकांचेही लक्ष

‘वॉयेज ऑफ हेरिटेज अँड होप’ या पुरस्काराने सन्मान

Total Views |

India Maritime Week 2025
 
मुंबई : ( India Maritime Week 2025 ) 'भारत मेरीटाईम वीक २०२५' मध्ये ओडिशा राज्याने नाविन्यपूर्णता आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित केला आहे. मुंबईत आयोजित या कार्यक्रमात ओडिशा राज्याच्या स्टॉलला “सर्वोत्तम स्टॉल” म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री माननीय सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याच्या वतीने ओडिशाचे अतिरिक्त सचिव, वाणिज्य व परिवहन विभाग बिधान चंद्र रे संचालक, बंदरे आणि अंतर्गत जलवाहतूक पद्मलोचन रौल आणि मुख्य नौकानयन अधिकारी, ओडिशा मेरीटाईम बोर्ड कॅ. सुशांत बाग यांनी हा सन्मान स्वीकारला.
 
हेही वाचा : ‘वन्दे मातरम्‌‍‌’ गौरव महोत्सवाचे उद्घाटन
 
हा स्टॉल वाणिज्य व परिवहन विभाग, ओडिशा सरकार आणि ओडिशा मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आला होता. “ओडिशा : वारशाची आणि आशेची सफर” या थीमवर आधारित या स्टॉलने राज्याच्या सागरी प्रवासाची उत्क्रांती जिवंतपणे सादर केली. प्राचीन बोइता बंदाना परंपरा आणि कलिंगाच्या जहाजबांधणी कौशल्यापासून ते आधुनिक काळातील बंदराधारित विकास, जहाजबांधणी क्लस्टर, अंतर्गत जलमार्ग, क्रूझ पर्यटन आणि ब्लू इकॉनॉमी उपक्रमा पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. या स्टॉलने आपल्या सर्जनशील रचना, प्रभावी कथनशैली आणि दृष्टिक्षेपशील सादरीकरणामुळे मान्यवर, उद्योगनेते आणि अभ्यागतांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ओडिशाच्या गौरवशाली सागरी इतिहासाला आणि टिकाऊ किनारी तसेच व्यापारी विकासाच्या भविष्यातील दृष्टीकोनाला एकत्र जोडणाऱ्या या संकल्पनेने सर्वत्र कौतुक मिळवले.
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.