Minister Mangalprabhat Lodha : संपूर्ण मुंबईची मतदार यादी रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांनी भरलेली

01 Nov 2025 20:10:39
Minister Mangalprabhat Lodha
 
मुंबई : (Minister Mangalprabhat Lodha) अस्लम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी या तिघांच्याही मतदारसंघाची मतदार यादी तपासली जावी. कमीत कमी ५ हजार बांग्लादेशी, रोहिंगे तिथे सापडतील. संपूर्ण मुंबईची मतदार यादी रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांनी भरलेली आहे, असे वक्तव्य कौशल्य विकास आणि उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी केले.
 
महाविकास आघाडीसह सहयोगी पक्षांनी काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या विरोधात गिरगाव येथे आयोजित भाजपच्या मूक आंदोलनात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम यांच्यासह अनेक आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 हेही वाचा :  Asiatic Society : एशियाटिकच्या भोंगळ कारभारावर कर्मचारीवृंद नाराज!
 
मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) म्हणाले की, "अस्लम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी या तिघांनी याकूब मेमनची फाशीची शिक्षा रद्द करा असे पत्र राष्ट्रपतींना लिहिले होते. येत्या ७ दिवसांत निवडणूक आयोगाने या तिघांच्याही मतदारसंघातील मतदार यादीचा तपास करण्याचे आदेश द्यावे. या मतदार यादीत कमीत कमी ५ हजार बांग्लादेशी, रोहिंगे सापडतील. संपूर्ण मुंबईची मतदार यादी रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांनी भरलेली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५ हजारांहून अधिक बांगलादेशी, रोहिंगे आढळले तर या तिघांनीही राजीनामा द्यावा," अशी मागणी त्यांनी केली.
 
निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
 
"मी निवडणूक आयोगाला अस्लम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी या तीन आमदारांच्या मतदारसंघातील मतदारयादी तपासण्याबाबत पत्र लिहिणार आहे. इथल्या मतदार याद्यांमध्ये किती बांगलादेशी, रोहिंग्या आढळतात ते बघावे. त्यांना मुंबईत कुणी आणले, आधार कार्ड केंद्र कुणी उघडले हे तपासावे," असेही ते म्हणाले.
Minister Mangalprabhat Lodha 
विरोधकांना धडा शिकवण्याची गरज
"विधानसभा निवडणूकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करू शकतात हे मुंबईकरांनी बघितले. त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांनी मतदार यादीचा विषय आणला. मुंबईच्या या स्थितीला कोण जबाबदार आहे, याचा जनतेने विचार करावा. उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षात मुंबई लुटून खाल्ली असून आता त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. मुंबईकर जागरूक असून काय करायचे, हे त्यांना माहिती आहे. मालवणीमध्ये जनता दरबार घेतला तेव्हा एका विधानसभेत २२ हजार ४५८ अनधिकृत बांधकामांची यादी आली. यासाठी कोण जबाबदार आहे, ते तपासावे लागेल," असेही मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0