JNU : 'जेएनयू'त अभाविपचे शक्ती प्रदर्शन, मशालींच्या प्रकाशात दुमदुमला “भारत माते'चा जयघोष

01 Nov 2025 16:56:23
JNU
 
मुंबई : (JNU) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून शुक्रवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एक भव्य मशाल यात्रा काढण्यात आली. ही मशाल यात्रा जेएनयूच्या प्रसिद्ध गंगा ढाब्यापासून सुरू होऊन चंद्रभागा वसतिगृहापर्यंत गेली, ज्यामध्ये विविध विभागांतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या मशाल यात्रेचे नेतृत्व अभाविपच्या अध्यक्षपदाचे उमेदवार विकास पटेल, उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार तान्या कुमारी, सचिव पदाचे उमेदवार राजेश्वर कांत दुबे आणि संयुक्त सचिव पदाचे उमेदवार अनुज यांनी केले. विद्यार्थ्यांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' या घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दुमदुमवून टाकला होता.
 
अभाविप जेएनयूचे (JNU) केंद्रीय निवडणूक समन्वयक अरुण श्रीवास्तव म्हणाले की, गंगा ढाब्यापासून चंद्रभागा वसतिगृहापर्यंत निघालेल्या भव्य मशाल यात्रेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रचंड उत्साहातून हे स्पष्ट दिसत आहे की जेएनयूमधून डाव्या विचारसरणीचा प्रभाव आता संपणार आहे आणि विद्यार्थी परिषद जेएनयू विद्यार्थी संघ निवडणुकीत चारही पदांवर दमदार विजय मिळवणार आहे.
 
हेही वाचा :  'हाॅक माॅथ'च्या दोन प्रजातींची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद; साताऱ्यात सखोल संशोधन
 
 जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघ निवडणुकांच्या हालचाली सुरू होताच पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे, पण या वेळेस चित्र थोडेसे बदललेले दिसतेय. दीर्घकाळापासून कॅम्पसच्या राजकारणावर पकड ठेवणारे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी संघटन आता दबावाखाली दिसत आहेत, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अधिक संघटित आणि आत्मविश्वासपूर्ण रूपात पुढे आली आहे.
 
अभाविपचा दावा आहे की मागील निवडणुकांमध्ये डाव्या संघटनांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढा दिला आणि अनेक कॉलेजांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. एवढेच नव्हे तर संयुक्त सचिव पदावरही अभाविपने विजय मिळवून इतिहास रचला होता. ही यशस्वीता अभाविपच्या सततच्या विद्यार्थी संपर्क, रचनात्मक उपक्रम आणि प्रशासनाशी संवाद राखणाऱ्या सक्रिय धोरणाचे फळ मानली जाते.
 
हे वाचलात का ? :  ओडिशा राज्याच्या स्टॉलने वेधले परीक्षकांचेही लक्ष
 
अभाविपचा आरोप आहे की सलग पराभवामुळे डाव्या गटांमध्ये अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठ येथेही डाव्या विद्यार्थी संघटनांचा जनाधार घटत चालला आहे. आता विद्यार्थी संघर्ष आणि घोषणाबाजीपेक्षा काम आणि जबाबदारीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. हाच प्रवाह जेएनयूसारख्या विचारप्रधान विद्यापीठातही दिसत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0