Asiatic Society : एशियाटिकच्या भोंगळ कारभारावर कर्मचारीवृंद नाराज!

01 Nov 2025 19:39:34
Asiatic Society
 
मुंबई : (Asiatic Society) मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये सध्या निवडणूकांची रणधूमाळी सुरु आहे. दि. ८ तारखेला द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या (Asiatic Society) अध्यक्षपद, चार उपाध्यक्षपद, सचिवपदासाठी तसेच व्यवस्थापन समिती आणि छाननी समितीसाठी निवडणूक होत आहे. अशातच आता संस्थेच्या भोंगळ कारभारावर कर्मचारीवृंदाने नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एशियाटीक सोसायटीसमोर (Asiatic Society) प्रश्नांचा डोंगर उभा असल्याचे बोलले जात आहे.
 
हेही वाचा :  Sikander Sheikh : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक
 
नाव न सांगण्याच्या अटीवर दै. मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना कर्मचारी म्हणाले की कोरोना काळापासूनच द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई (Asiatic Society) कोरोनाकाळापासूनच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. आर्थीक नियोजनाच्या अभावामुळे अनेक दिवस कर्मचाऱ्यांचे पगार, महागाई भत्ता रखडतो, वेळच्या वेळी मिळत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पातळीवर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. संस्थेचे आर्थीक गणित व्यवस्थित नसल्याने एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तर निर्माण होतोच, परंतु त्याचबरोबर जुन्या ग्रंथांचे जतन, अभिलेखागाराचे अद्ययावतीकरण या बाबतीत सुद्धा समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात काही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर, त्यांच्या जागी नव्या कर्मचाऱ्यांची भरती होणे अपेक्षित होते, मात्र ती भरती न झाल्यामुळे वर्तमानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो आहे. या संदर्भात एशियाटिक सोसायटीच्या (Asiatic Society) अध्यक्ष विस्पी बालापोरिया यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी पगार उशिरा होतो हा आरोप फेटाळून लावला. संस्थेच्या कामकाजावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की " कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवरच होतात. मात्र, काही वेळेला महागाई भत्त्याची मागणी वाढवून केली जाते. येणाऱ्या काळात संस्थेच्या आर्थीक स्त्रोतांवर, संसाधनांवर पुनर्विचार होणे गरजेचे आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी योग्य त्या आर्थिक गुंतवणूकीचा विचार होणे गरजेचा आहे." येणाऱ्या काळात या आणि अशा अनेक समस्यांवर तोडगा निघेल अशी या कर्मचारी वृंदाची आशा आहे.
  
Powered By Sangraha 9.0