मुंबई : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील काही भागात आय लव्ह मोहम्मद लिहलेल्या पोस्टरवर धमकीचा संदेश देण्यात आला. या पोस्टरवर वाक्य लिहिले होते की, “हिशोबात राहा, आम्ही धीर धरतोय, याचा अर्थ आम्ही कबरीत आहोत असा नाही” दरम्यान दोन गटांत तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पोस्टर काढून टाकले.
हाती आलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की हिंदूंना धमकी देणारे हे पोस्टर अनेक दुकानांच्या भिंतींवर, गल्ल्यांमध्ये अचानकच लावण्यात आले. काही नागरिकांनी सांगितले की, हे पोस्टर त्यांनी त्यांची ताकद दाखवण्यासाठी आणि समाजातली शांतता मोडून धार्मिक तणाव वाढवण्यासाठी लावले असावेत.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकाराने सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोस्टर लगेच हटवण्यात आले. सर्वांनी शांतता राखणे गरजेचे आहे, जर अशा घडामोडी जाणीवपूर्वक घडवल्या जात असतील तर हे घडवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. सदर घटनेचा तपास सुरू असून हे पोस्टर कोठून आले आणि ते लावण्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध चालू आहे.