दिव्यांगांचा रौप्यमहोत्सवी जल्लोष !

09 Oct 2025 18:25:07

मुंबई : 'हँडिकॅप अर्न अँड लर्न ट्रस्ट होम' ही अपंगांनी अपंग व समाजातील अन्य गरजू व अनाथ जेष्ठ नागरिकांसाठी चालविली जाणारी संस्था आहे. अन्य अनेक उपक्रमांबरोबरच दिव्यांगांसाठी गरबा व त्याच दिवशी त्यांना दिवाळीसाठी आवश्यक शिधावाटप करण्यात येते! या स्तुत्य उपक्रमाचे हे पंचविसावे वर्ष आहे. नुकताच तालमकी वाडी ताडदेव इथे दिव्यांगांचा गरबा मोठ्या जल्लोषात पार पडला. सुमारे दीडशे दिव्यांग निरनिराळ्या ठिकाणाहून आले होते. रोटरी क्लब ऑफ हँगिंग गार्डन यांनी कार्यक्रम पुरस्कृत (स्पॉसर) केला. कार्यक्रमाला संस्थेचे ट्रस्टी अवधूत राणे, अध्यक्षा सुपर्णा शाह जोशी, अनिता पाटील, मीना खारवा, मिनाक्षी आमरे, फारूक शेख (सर्व दिव्यांग) हे पदाधिकारी उपस्थित होते. व्हील चेअरवर असलेल्या दिव्यांगांचा जोष त्यांचे दिव्यांगत्व झाकून टाकत होता. त्यानंतर सर्वांना भोजन देवून या रौप्य महोत्सवी जल्लोषाची सांगता झाली.


Powered By Sangraha 9.0