मुंबई : उत्तर प्रदेशमधील दुर्जनपुर कलां गावात मौलाना रेहान रजा खान याने ८० कोटी हिंदूंविषयी भडकाऊ आणि अभद्र टिप्पणी केली. मौलाना म्हणाला की, ते (हिंदू) ८० कोटी असले तरी बुटाखाली घेण्याची ताकद आम्ही ठेवतो. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदूवादी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
दुर्जनपुर कलां गावातील रहिवासी डालचंद यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी तक्रारीत लिहले की, मौलाना रजा याने काही लोक आणि मुलांसमोर या वक्तव्याद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मौलानाला अटक करावी अन्यथा गावातील ग्रामस्थ पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करतील." दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर हिंदूवादी संघटनांनी देखील पोलिस ठाण्यात जाऊन कडक कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर मौलाना रेहान रजा खान याच्यावर धार्मिक द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.