रामललाच्या दर्शनासाठी ४० दिवसांची पदयात्रा, ७३ वर्षीय रामभक्ताचा उत्साह; अयोध्या रथयात्रेदरम्यान केलेला संकल्प ३५ वर्षांनी पूर्ण

09 Oct 2025 19:20:13

मुंबई : प्रभु श्री रामलला प्रति समर्पण आणि संकल्पपूर्तीच्या निश्चयाने गुजरातच्या ७३ वर्षीय जयंतीलाल हरजीवन दास पटेल यांनी १३३८ किलोमीटरची पदयात्रा पूर्ण करून नुकताच अयोध्या धाम येथे प्रवेश केला. ते गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोदीपुर गावचे रहिवासी आहेत.

जयंतीलाल हरजीवन दास पटेल यांनी सांगितले की, ऑक्टोबर १९९० मध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेदरम्यान जेव्हा ही रथयात्रा मेहसाणा येथे पोहोचली, तेव्हा त्यांनी उत्साहाने यात सहभागी होण्याची संधी घेतली होती. त्यावेळी मंदिर पूर्ण झाल्यावर मेहसाणा ते अयोध्या पदयात्रा करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. आता, रामलला, राम दरबार सहित परिसरातील आणि परकोटातील आठ इतर मंदिरांची प्राण प्रतिष्ठा आणि ध्वजारोहण होणार असल्यामुळे, संकल्पपूर्तीसाठी त्यांनी ही पदयात्रा पूर्ण केली.

जयंतीलाल पुढे म्हणाले की, ते दररोज ३३–३५ किलोमीटर चालत होते, रात्री विश्रांती घेत होते. दि. ३० ऑगस्टला सुरू झालेली ही पदयात्रा ४० दिवसांनंतर अयोध्येत संपली. आपल्या या प्रवासात त्यांनी बहुतेक वेळा मंदिरे, सार्वजनिक उद्याने आणि अतिथीगृहे या ठिकाणी भोजन व विश्रांती घेतली.


Powered By Sangraha 9.0