मुंबई : “सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्रमाला राज्यसभेचे माजी खासदार मा. विनयजी सहस्रबुद्धे, विद्यमान खासदार मा. मेधाताई कुलकर्णी आणि persistent या कंपनीचे संस्थापक आनंदज देशपांडे उपस्थित होते.
सुरुवातीला स्वरार्जुन या अर्जुनाच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारीत श्रीपाद सहस्त्रबुद्धे यांनी रचलेली आणि संगीतकार माधुरी नाईक यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर केली. तबल्यावर साथ देण्यास अमेय ठाकुरदेसाई होते.
पुस्तकाला आनंद देशपांडे आणि विनय सहस्रबुद्धे या दोघांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.आपलें मनोगत व्यक्त करताना विनयसहस्रबुद्धे म्हणाले की अर्जुनाला केंद्रस्थानी ठेवून त्याचे कालातीत महत्व सांगताना लेखक द्वयीने कुठेही रुक्ष लिखाण न होऊ देता अतिशय ललित पद्धतीने विषय हाताळला आहे आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्टय आहे. मेधाताई कुलकर्णी यांनी अर्जुन आणि कृष्ण यांचे संबंध आणि संवादाचे महत्व विषद केले.
डॉ मेघना दलाल यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना अर्जुनाची निवड का केली यावर भाष्य केले. वैभव केळकर यांनी अर्जुनाच्या बृहन्नला रूपाला अर्धनारिश्वर आणि शिवशक्तीची जोड देऊन gender equality प्रमाणेच gender equilibrium साधला जाणे महत्वाचे आहे असे विचार मांडले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला श्री विनायक बापट, नरेंद्र बऱ्हाटे, मिलिंद गुंजाळ, सुनील भंडगे, श्रीनिवास शारंगपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.