मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे On Field!; प्रभाग अधिकाऱ्यांसमवेत समक्ष घेतला कर वसुलीचा आढावा!

08 Oct 2025 13:48:08

मुंबई : महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कर करप्रणालीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कर वसुलीवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त करवसुली करणेबाबत निर्देश दिले आहेत, त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी आज दुपारी स्वतः २/ब प्रभाग क्षेत्र व ३/क प्रभाग क्षेत्र कार्यालयास भेट देऊन ,ब प्रभागाच्या सहा. आयुक्त प्रीती गाडे व क प्रभागाचे सहा. आयुक्त धनंजय थोरात यांचे समवेत संबंधित प्रभागातील कर वसुलीचा आढावा घेतला आणि कर विभागातील अधिक्षक/वरिष्ठ लिपीक तसेच प्रत्येक भाग लिपीक यांचेकडून त्यांचेकडे असलेली भाग निहाय थकबाकीदारांची यादी, तसेच सर्वोच्च थकबाकीदारआणि वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकी प्रलंबित असलेले मालमत्ता करधारक यांचे माहिती संकलीत करुन त्यांचेवर तातडीने जप्ती, लिलाव तसेच कायदेशीर कारवाई प्रस्तावित करणेबाबत निर्देश दिले.

आढावा बैठकीत प्राप्त झालेल्या थकबाकीदारांच्या यादीनुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी ३/क प्रभागातील अधिक्षक बजागे यांचेसमवेत मे. शेलार कन्स्ट्रक्शन यांच्या कार्यालयास भेट दिल्याने मे. शेलार कन्स्ट्रक्शन यांचेमार्फत श्री. चेतन शेलार यांनी मालमत्ता कर थकबाकी एकूण रक्कम रु. १९,८९,५८२/- चा धनादेश अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचेकडे जमा केला.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार यापुढेही कर विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत करवसुलीसाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाणार आहे .नागरिकांनी देखील आपला कर वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.


Powered By Sangraha 9.0