मुंबई : उत्तर प्रदेशातील औरैया येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भगवान वाल्मीकी जयंतीच्या पार्श्वभूमीवर पढीन दरवाजा येथील वाल्मीकी वस्तीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिषदेतर्फे कार्यकर्त्यांनी भगवान वाल्मीकी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पूजा व आरती करून अभिवादन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात वस्तीतील मुलांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या योजनेद्वारे वंचित घटकातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. तसेच शिक्षणाची प्रेरणा येण्यासाठी शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.
परिषदेचे विभाग संयोजक सुदीप चौहान यांनी कार्यक्रमात सांगितले की, “भगवान वाल्मीकी यांनी समाजाला ज्ञान, समानता आणि आदर्श जीवनाचे मार्गदर्शन केले. त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि समाजात समरसता व सद्भाव निर्माण करण्यास त्यांचे योगदान अनुकरणीय आहे.”
औरैया नगर उपाध्यक्ष शोभित द्विवेदी यांनी म्हटले की, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण हा शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक उपक्रम आहे.”
कार्यक्रमात नगर सह मंत्री विकास वाल्मीकी, SFS(स्टुडंट फॉर सेवा) नगर संयोजक कृष्णा गौर, मंत्री भाग्या अवस्थी, वन नेशन वन इलेक्शनचे सह संयोजक कुलदीप सेंगर, व्योम वर्मा, आरवन राय, सूर्य प्रताप कुशवाह यांसह अन्य मान्यवर, विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.