भारताला विश्वमित्र बनवणे हेच संघाचे ध्येय : मनोज कुमार

07 Oct 2025 18:45:11

मुंबई : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अत्यंत व्यापक आहे. संघाने व्यक्ती-व्यक्तीपासून विश्वव्यापी कार्य केले. हिंदू समाजाचे संघटन करणे आणि भारताला विश्वमित्र बनवणे हेच आता संघाचे ध्येय आहे", असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री मनोज कुमार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त इंद्रप्रस्थ साहित्य भारती आयोजित द्विदिवसीय समग्र संघ साहित्य परिचर्चेच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

मनोज कुमार यांनी सांगितले की, समग्र संघ साहित्य परिचर्चा यासाठी आयोजित केली गेली आहे की संघाचा विचार साहित्याच्या सर्व विधांमधून जनतेपर्यंत पोहोचू शकेल. संघ साहित्याची शैली भले अत्यंत उत्कृष्ट नसेल, पण त्यातील विषयवस्तू नेहमी तथ्यात्मक असते. इंद्रप्रस्थ साहित्य भारतीचे कार्यकारी अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद बब्बर यांनी सांगितले की, इंद्रप्रस्थ साहित्य भारती सातत्यपूर्ण साहित्यिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात साहित्याबद्दलची रुची निर्माण करत आहे.

यापूर्वी दुसऱ्या सत्रात एकूण २० साहित्यकार, प्राध्यापक आणि संशोधकांनी विविध विषयांवरील संघ विचारकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा सार प्रस्तुत केला. दुसरे आणि समारोप सत्राचे संचालन कार्यक्रम सह-संयोजक प्रा. सारिका कालरा यांनी केले, तर धन्यवाद ज्ञापन इंद्रप्रस्थ साहित्य भारतीच्या कार्यकारिणी सदस्य डॉ. रजनी मान यांनी केले.


Powered By Sangraha 9.0