नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन!

07 Oct 2025 17:03:41

नवी मुंबई : भारताला जागतिक विमानतळ केंद्रात रुपांतरित करण्याच्या दृष्टीकोनासह देशाचे पंतप्रधान लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा १चे लोकार्पण करणार आहेत. सुमारे १९,६५० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेले हे विमानतळ भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP)अंतर्गत विकसित करण्यात आले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत काम करून शहरातील वर्दळ कमी करणे आहे. याचसोबत, मुंबईला जागतिक मल्टी-एअरपोर्ट सिस्टिम्स मध्ये आणणे आहे. ११६० हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले हे विमानतळ भविष्यात दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळेल.

विशेष वैशिष्ट्यांमध्ये ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) प्रणालीचा समावेश आहे, जी चार टर्मिनल्समधील प्रवाशांसाठी सहज इंटर-टर्मिनल ट्रान्सफर सुविधा देईल. ऑटोमेटेड पीपल मूव्हर म्हणजे एक स्वयंचलित ट्रेन किंवा शटल सेवा जी एअरपोर्ट किंवा मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये प्रवाशांना सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तयार केली जाते. स्वयंचलित म्हणजेच याला चालकाची गरज नाही; सिस्टम आपोआप चालते. यामुळे टर्मिनल्स, पार्किंग, कार रेंटल, किंवा शहराशी जोडलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रवाशांना लगेच आणि आरामात पोहोचवते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात चार टर्मिनल्स जोडण्यासाठी एपीएम वापरले जाईल, ज्यामुळे प्रवाशांना सोप्या आणि जलद इंटर-टर्मिनल ट्रान्सफरची सुविधा मिळेल.

सतत टिकाऊ पद्धतींचा अवलंब करत, विमानतळात सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल साठवणूक, सुमारे ४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती, आणि इलेक्ट्रिक बस सेवाद्वारे शहरातील प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटीची सोय असेल. याशिवाय, नवी मुंबई विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ असेल जे वॉटर टॅक्सीनेही जोडले जाईल.


Powered By Sangraha 9.0