मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगरअध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. दरम्यान मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी ५० टक्के म्हणजेच ३४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर ३३ नगरपरिषदांपैकी १७ नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी महिना संपण्याच्या आधी घेण्यात याव्या, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले होते आणि सोमवारी मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
नगरपरिषद आरक्षण सोडत
१) ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती, महिला आरक्षण जाहीर
अकलूज, तेल्हारा, वानाडोंगरी, भुसावळ, ओझर, देऊळगाव राजा, घुग्गुस, चिमूर, शिर्डी, सावरा, मेंदर्गी, डोंगडोह देवी, दिग्रस, परतूर, बीड, शिरोळ
२) अनुसूचित जमाती प्रवर्गात पुढील नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर
वणी, भडगांव, पिंपळनेर, उमरी, यवतमाळ, शेंदुरजनाघाट
३) नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) यापैकी ५० टक्के म्हणजेच ३४ जागा महिलांसाठी राखीव
तिरोडा, वाशिम, धामणगाव रेल्वे, भोकरदन, भद्रावती, परांडा, भगूर, मालवण, नंदुरबार, खापा, वरोरा, हिंगोली, मोर्शी, शहादा, उमरेड, नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर, पूळगाव बदलापूर, मंगरूळपीर, कन्हान पिंपरी, पाथर्डी, देगलूर, नेर नवापूर, धाराशिव, इगतपुरी, रामटेक, माजलगाव, नशिराबाद, पालघर, मूल, वरणगाव, बल्लारपूर, मलकापूर बुलढाणा, इस्लामपूर, जुन्नर, कुर्डूवाडी, मोहपा, तुमसर, औसा, महाड, मुरूड जंजिरा, अकोट, राहता, श्रीवर्धन, विटा, ब्रम्हपुरी, दर्यापूर, चोपडा, वैजापूर, सटाणा, काटोल, गोंदिया, सांगोला, दौंड, रोहा, वर्धा, देसाईगंज, येवला, पुलगाव, कर्जत (रायगड), दोंडाईचा वरवाडे, कंधार, शिरपूर वरवाडे
४) खुला प्रवर्ग एकूण १३६ पदांपैकी ६८ पदे महिलांसाठी
परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर-कोल्हापूर, मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनुरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगूड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, भूम, रत्नागिरी, रहीमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलूस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदीरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग
नगरपंचायत आरक्षण सोडत
१) अनुसूचित जाती महिला
अनुसूचित जाती १८ पैकी ९ जागा महिलांसाठी
गोधनी रेल्वे, नीलडोह, गौडपिंपरी, अहेरी, बेसा-पिंपळा, कोरची, ढाणकी, धानोरा, बहादूरा
२) अनुसूचित जमाती १३ पैकी ७ महिलांसाठी
भिवापूर, अर्जुनी मोरगाव, देवळा, समुद्रपूर, सिरोंचा, हिंगणा, पाली
३) नागरिकांचा मागास प्रवर्ग (४०)
पारनेर, तळा, घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, खानापूर, माढा, पोंभुर्णा, माहूर, वडवणी, पोलादपूर, आटपाडी, खालापूर, मालेगांव जहांगीर, शिरूर अनंतपाळ, पालम, कळवण, मंठा, सावली, कोंढाळी, मानोरा, मारेगाव, माळशिरस, आष्टी (वर्धा), एटापल्ली, झरी-जामणी, तलासरी, जाफराबाद, चाकुर, तीर्थपुरी, कणकवली, शिरूर कासार, आष्टी (बीड), विक्रमगड, अकोले, जिवती, मोखाडा, कर्जत (अहिल्यानगर), सुरगणा ,यातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव
४) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (२०)
पोलादपूर, तलासरी, आष्टी (बीड), वडवणी, कळवण, घनसावंगी, सावली, कर्जत (अहिल्यानगर), मारेगाव, पाटोदा, खालापूर, मंचर, भामरागड, शिरूर अनंतपाळ, माढा, जाफराबाद, जिवती, आष्टी (वर्धा), चाकुर, मानोरा
खुला प्रवर्ग एकूण ७६ पदे
५) खुला प्रवर्ग महिला (३८)
मोहाडी, बार्शी टाकळी, वाशी, म्हाळुंग श्रीपूर, नांदगाव खंडेश्वर, गुहागर, राळेगाव, लाखांदूर, वैराख, सोयगाव, महादुला, अनगर, कडेगांव, पेठ, पाटण, औंढा नागनाथ, लाखनी, रेणापूर, नातेपुते, म्हसळा, सडक अर्जुनी, दिंडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, सिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवणी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताईनगर, बाभुळगाव
६) लगतपूर्व महिलांसाठी खुला प्रवर्ग आरक्षित असलेल्या वगळण्यात आलेल्या जागा
मौदा, कारंजा, चामोर्शी, महागाव, बदनापूर, सेनगाव, नायगाव, निफाड, नेवासा, दापोली, देवगड जामसंडे, कुडाळ, वैभववाडी, कोरेगाव, वडूज, शिराळा, चंदगड