मुंबई : डेटा डायनॅमिक अॅनालिसिस अँड रिसर्च फाऊंडेशन, नवी दिल्ली य आणि टाटा इंस्टिटयुट ऑफ सोशल सायन्स(टीस) च्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण : समावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) आणि माहिती तंत्रज्ञान (खढ) यांचा वापर" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे.हा परिसंवाद डेटा डायनॅमिक अॅनालिसिस अँड रिसर्च फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत अरमायटी देसाई हॉल, मुख्य कॅम्पस, टिस मुंबई येथे होणार आहे. यावेळी प्रोफ बद्रिनारायण तीवारी व्हाईस चॅन्सलर टिस, तसेच मा.मंत्री विजय भाई गिरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल तर परिसंवादाचे अखिल भारतीय हितरक्षा प्रमुख वनवासी कल्याण आश्रमचे गिरीश कुबेर हे मुख्य वक्ता आहेत. तसेच या परिसंवादामध्ये डॉ बिपीन जोजो, डॉ शिलोहू राव भद्रो लक्रा, सी जी सोनावालीस, प्रो नंदिता सैकिया,मिहिर कुमार,मिलींद थत्ते सुबिर पॉल हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.