
कल्याण : बी.के. बिर्ला महाविद्यालय ( स्वायत्त ),कल्याण मराठी विभाग आणि तहसिल कार्यालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा वर्धापन दिन’ सोहळा बिर्ला महाविद्यालयात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘सृजन’ मुलांनी तयार केलेल्या भितीपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात दीप प्रज्वलानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाविषयीचे सुंदर श्रुतिका आणि वासुदेव यांच्या सहाय्याने बोली विसरत चालले आहे यांची खंत करणारा एकपात्री निरज रोकडे या विद्यार्थ्याने उभा केला. यावेळी डॉ. दौलतराव कांबळे, कल्याण तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी सुजित चव्हाण , प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ . कांबळे म्हणाले, मराठी भाषा ही पूर्वपरंपरागत सर्वश्रेष्ठ असून तिला मिळालेला दर्जा हा तिची समृद्ध परंपरा वृध्दिंगत करणारा आहे. ज्या भाषेला समृद्ध वैभवशाली परंपरा आहे अशी मराठी भाषा विविध संप्रदायांच्या विचारधनातून उभा राहिलेली सांस्कृतिक परंपरा नाथ परंपरा, महानुभाव, संत,पंत आणि तंत या साहित्यातून दिलेली शिकवण शिरोधार्य मानून मराठी माणसांची सुरु असलेली वाटचाल मराठीला निश्चितपणे पुढे घेऊन जाणारी आहे. मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलून नव्या धर्तीवर तीच्याकडे पाहिल्यास मराठी माणसाला जगात सर्वश्रेष्ठत्व प्राप्त होईल. अशी खुणगाट सर्वांनी बांधणे गरजेचे आहे." असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालय, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी सुजित चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कला शाखा उपप्राचार्य डॉ .महादेव यादव यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास नायब तहसिलदार दीपक गायकवाड व तहसिल कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सीताराम म्हस्के यांनी केले . त्यामधून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या कार्यक्रमास वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. मल्हारी मसलखांब यांनी मानले.