मत्स्यपिल्लांच्या संवर्धनासाठी 'CMFRI'कडून मच्छिमारांसाठी पत्रके; मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

06 Oct 2025 21:20:16

CMFRI minimum legal size

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार दि. ६ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्राचा राज्य मास पापलेटच्या पिल्लांच्या मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संवर्धनात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला (CMFRI minimum legal size). यावेळी 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'चे (सीएमएफआरआय) संशोधक उपस्थित होते (CMFRI minimum legal size). यावेळी राणे यांनी 'सीएमएफआरआय'कडून मत्स्यपिल्लांच्या मासेमारीसंदर्भात तयार केलेल्या पत्रकांचे अनावरण देखील केले (CMFRI minimum legal size). ही पत्रके मच्छिमार बोटींवर आणि बंदरावर लावण्यात येणार आहेत (CMFRI minimum legal size).
 
 

राज्यात मत्स्यपिल्लांच्या मासेमारीवर निर्बंध आणण्यासाठी 'मिनिमम लिगल साईज' (एमएलएस) धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये किती आकाराच्या माशांची मासेमारीवर करावी, यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली असून ती बंधनकारक करण्यात आली आहे. असे असताना देखील राज्यात पापलेटच्या पिल्लांच्या मासेमारीसंदर्भात काही ठिकाणी या धोरणातील नियमांची पायमल्ली केली जाते. त्यामुळे पापलेटबरोबर इतर मत्स्यप्रजातीचे मासे हे कोणत्या विहीत आकारापर्यंत पोहोचावे यासाठी 'सीएमएफआरआय'कडून जनजागृतीचे प्रयत्न होत आहेत. यासंदर्भातील एक बैठक सोमवारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त आणि 'सीएमएफआरआय'चे मुंबई प्रादेशिक केंद्राचे वैज्ञानिक-प्रभारी उपस्थित होते.
 
 

या बैठकीत राणे यांनी 'एमएलएस'च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी. तसेच लहान रौप्य पापलेट माशांच्या पकडीवर नियंत्रण आणण्यासाठी विस्तृत जनजागृती आणि अंमलबजावणी मोहीम राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की, या उपाययोजना या प्रजातीच्या शाश्वततेसाठी तसेच समुद्रकिनारी मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या समाजाच्या उपजीविकेच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
 
 

 

पापलेट आणि इतर महत्त्वाच्या मत्स्यप्रजातीचे मासे पकडण्यासाठी 'एमएलएस' धोरणामध्ये नमूद असलेल्या विहित आकाराची माहिती देणारे पत्रक 'सीएमएफआरआय'ने तयार केले आहेत. 'एमएलएस' धोरणानुसार १३.५ सेमी आणि त्यापेक्षा आकाराने मोठ्या असणारे पापलेट पकडणे अनिर्वाय आहेत. कारण, १३.५ सेमी पर्यंत वाढलेल्या पापलेटने एकदा तरी पिल्लांना जन्म दिलेला असतो. 'सीएमएफआरआय'ने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मदतीने याच संदर्भातील पत्रक तयार केले असून ते मच्छिमारांच्या बोटीत आणि मासळी उतरवण्याच्या बंदरांवर लावण्यात येणार आहेत. या उपक्रमांद्वारे मच्छिमार, व्यापारी आणि किनारी समुदायांमध्ये लहान माशांचे संवर्धन आणि 'एमएलएस' नियमांचे पालन याविषयी जागरूकता वाढवून शाश्वत मत्स्यव्यवस्थापन साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0