मुंबई : वस्ती उपक्रम 'स्त्री शक्तीचा जागर' या कार्यक्रमाचे आयोजन दि.५ ऑक्टोबर, रविवार रोजी धन्वंतरी सभागृह, पटवर्धन बाग येथे करण्यात आले होते. श्रीसुक्त पठण आणि त्यानंतर भोंडला असा कार्यक्रम संपन्न झाला. संभाजी नगरातल्या सर्व वस्तींमधून अत्यंत उत्साहात पारंपरिक वेशभूषा परिधान करून सत्तर भगिनी एकत्र जमल्या होत्या. वरुणराजाने कार्यक्रमाच्या आधी जणू सडा शिंपला.शंखनादाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रीसुक्ताची आवर्तनं आणि त्या नंतर भोंडल्याची पारंपरिक गाणी आणि त्याला जोड नवीन गाण्याची असा भोंडला रंगत गेला. सर्वांनी उत्साहात भोंडल्याची गाणी म्हणली आणि फेर धरला. वय वर्ष ६ ते ८० अशा सर्व वयोगटातील भगिनी या कार्यक्रमात उत्साहाने सामील झाल्या होत्या.
त्या नंतर आगामी होणाऱ्या गृहसंवाद, हिंदू संमेलन या उपक्रमाविषयी सुतोवाच केले. सर्वांना नरकचतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दीपोत्सव करण्याविषयी आणि vocal for local यासाठी आवाहन करण्यात आले.खिरापत वाटपानी कार्यक्रमाची सांगता झाली. असेच आपण सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम करूयात या संदेशाने या कार्यक्रमाची सांगता झाली.