तुम्ही कोणत्या जनरेशनचे? जाणून घ्या पिढ्यांची वेगळी ओळख

05 Oct 2025 18:54:01

मुंबई :
सध्या जगभरात जेनझी हा शब्द बराच गाजतोय. सोशल मिडियावर गरजेपेक्षा जास्त या शब्दाचा वापर केला जातोय. जेनझी म्हणेज १९९७ ते २०१२ मध्ये जन्माला आलेली पिढी, म्हणेजच सध्याची तरुण पिढी. प्रत्येक पिढीची आपली वेगळी ओळख असते, कारण त्यांची विचारसरणी, जीवनशैली, कार्यपद्धती आणि मूल्ये यांमध्ये फरक असतो.उदाहरणार्थ, ग्रेटेस्ट जनरेशन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठतेसाठी ओळखली जाते, तर जेनरेशन झेड ही डिजिटल नेटिव्ह पिढी असून सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाशी जन्मजात परिचित आहे.

प्रत्येक जनरेशनने त्या काळातील आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले आहे, त्यामुळे त्या परिस्थितीला शोभतील अशा नावानेच त्या पिढीला ओळखले जाते. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल कि, तुम्ही कोणत्या जनरेशनचे आहात? तर ही माहिती तुमच्यासाठी...

१. जेनरेशन बीटा (२०२५-सध्या)
एआय (AI), रोबोटिक्स, AR/VR, क्वांटम टेक्नॉलॉजी यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानात वाढणारी ही पहिली पिढी असेल.

२.जेनरेशन अल्फा (२०१३-२०२४)
एआय (AI) च्या काळात जन्मलेली पिढी

३. जेनरेशन झेड (१९९७-२०१२)
झेड पिढी ही पूर्णपणे डिजिटल युगात वाढलेली आहे. त्यामुळे इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा सहज वापर ही त्यांची ओळख ही बनली आहे.

४. मिलेनियल्स (१९८१-१९९६)
मिलेनियल्स, म्हणजेच डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारलेली पिढी.

५. जेनरेशन एक्स (१९६५-१९८०)
इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात वयात आलेली आणि अनुभवाला जास्त महत्व देणारी पिढी.

६. बूमर (१९४६-१९६४)
दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेले लोक बूमर जेनरेशन म्हणून ओळखले जातात.

७. सायलेंट जनरेशन (१९२८-१९४५)
सायलेंट जनरेशन म्हणजे मोठ्या आर्थिक आणि सामाजिक संघर्षात वाढलेली पिढी.

८. ग्रेटेस्ट जनरेशन (१९०१-१९२७)
ग्रेटेस्ट जनरेशन म्हणजे पहिले आणि दुसरे महायुद्ध पाहिलेली पिढी, या जनरेशनला देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठतेसाठी ओळखली जाते.


Powered By Sangraha 9.0