'धवल निशा' विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन

05 Oct 2025 13:40:44

मुंबई : पंचम निषाद आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ' धवल निशा ' या विशेष संगीत मैफीलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर इथल्या कलांगण येथे आयोजित करण्यात आले आहे. या मैफिलीमध्ये प्रतिभावान बासरीवादक पारसनाथ, तसेच मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचं गाणं रसिक श्रोत्यांना ऐकायाला मिळणार आहे. या कार्यक्रमात यशवंत वैष्णव व अजिंक्य जोशी (तबला) आणि अभिषेक शिंकर (हार्मोनियम) वर साथ करणार आहेत. सदर कार्यक्रम निशुल्क असून, संगीत रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0