
नवी मुंबई : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई वाशी रुबी यांच्या वतीने सानपाड्याच्या विवेकानंद शाळेत इयत्ता आठवी आणि नववीच्या २० गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
या प्रसंगी लायन्स डिस्ट्रिक्टचे अॅक्टिव्हिटी प्रमुख लायन पांडे यांनी क्लबच्या या कार्याचे कौतुक केले. याशिवाय, झोन चेअरमन लायन स्मिता वाजेकर, क्लब प्रेसिडेंट लायन लिला शेठ, सेक्रेटरी आशा घोषाल आणि लायन लोणकर यांसह क्लबचे अन्य सदस्य उपस्थित होते.
क्लब प्रेसिडेंट लायन लिला शेठ यांनी सांगितले की, लायन्स क्लब समाजात अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.