वाराणसी : भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक वाहतूक रोप-वे प्रकल्प आता महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. वाराणसी येथे नुकत्याच ट्रायल रन सुरू झाल्या आहेत. अंदाजे ८१५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ३.८ किलोमीटरच्या पर्यावरणपूरक कॉरिडॉरमध्ये पाच स्थानके आणि १४८ गंडोला असतील. या रोप-वेचे उद्दिष्ट दररोज सुमारे एक लाख प्रवाशांची वाहतूक करणे आहे, ज्यामुळे संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटी वाढेल.
वाराणसी विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष पुलकित गर्ग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या प्रकल्पात प्रशस्त प्रतीक्षा क्षेत्रे आणि प्रवाशांना अनुकूल सुविधा असलेली पाच स्थानके आहेत. प्रकल्पाच्या एकूण खर्चात १५ वर्षांचा ऑपरेशन आणि देखभालीचा समावेश आहे. ही मार्गिका पूर्णपणे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर चा भाग आहे. या मार्गातील सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध असतील.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एचएआयची एक उपसंस्था एनएचएलएमएल (नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड) द्वारे हा रोप-वे विकसित केला जात आहे. दररोज सुमारे १ लाख प्रवासी प्रवास करतील असे १४८ गंडोला असतील, असेही गर्ग म्हणाले.