
मुंबई : भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने उद्या रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार सोहळा राजेश्री बॅंक्वेट हॉल, डी विंग, आर्चीड प्लाझा, मराठा कॉलनी, दहिसर (पूर्व) येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याला उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आयोजक आणि आरपीआयचे उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिली.