मुंबई : ( Pritam Mhatre ) उरण परिसरातील प्रवाशांना दररोज गर्दी व असुविधा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर नेरुळ - उरण लोकल १२ डब्यांची करण्यात यावी, तसेच फेऱ्या वाढवाव्या, अशी प्रवाशांच्या हिताची मागणी शेकापचे नेते प्रितम म्हात्रे यांनी केली. रेल्वे प्रशासनाकडे दि. ३० ऑक्टोबर रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), सीएसएमटी स्थानक येथे स्मरणपत्र देऊन करण्यात आली.
या पूर्वीही दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी याच विषयावर लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या सकारात्मक बैठकाही झाल्या, परंतु अद्याप कोणतेही ठोस पावलं उचलली न गेल्याने ही मागणी पुन्हा करण्यात आली आहे.
हेही वाचा : ५०४ बेपत्ता बांग्लादेशींविरुद्ध गुन्हा दाखल; किरीट सोमय्या यांची माहिती
दररोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला व नोकरदार वर्ग यांना गर्दीमुळे व असुविधांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल अपुऱ्या पडत आहेत. म्हणूनच प्रवाशांच्या सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत तातडीची असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.