मुंबई : (MPSC Result 2024) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १,५१६ उमेदवारांच्या ३० ऑक्टोबरपर्यंत मुलाखती चालल्या होत्या.
या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत.
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, "हा निकाल आरक्षण, समांतर आरक्षण आणि अन्य न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी हवी असल्यास, गुणपत्रक मिळाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे", असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\