५०४ बेपत्ता बांग्लादेशींविरुद्ध गुन्हा दाखल; किरीट सोमय्या यांची माहिती

31 Oct 2025 14:10:37
 
Kirit Somaiya
 
अमरावती : ( Kirit Somaiya ) अमरावती जिल्ह्यातील ५०४ बेपत्ता बांग्लादेशी, रोहिंग्या आणि अवैध नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली.
 
अमरावती महानगरपालिकेने १ हजार ७०९ बेकायदेशीरपणे जन्म प्रमाणपत्रे दिली असल्याचे उघड झाले होते. ही सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करून ती परत मिळवण्यासाठी कारवाई सुरु असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. दरम्यान, आता बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिकेने बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल ५०४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६, ३४० आणि ३१८ अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
 
हेही वाचा : शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी बंधनकारक; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
 
बेकायदेशीरपणे जन्म प्रमाणपत्रे मिळवल्यानंतर, फरार झालेल्या ५०४ (४८५ मुस्लिम आणि १९ हिंदू) लाभार्थ्यांविरुद्ध अमरावती येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१० दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपासानंतर या ५०४ लोकांना फरार घोषित केले जाणार असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0