गहाळ व चोरीला गेलेले २७ मोबाईल फोन उल्हासनगर पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन

    30-Oct-2025
Total Views |
Ulhasnagar
 
उल्हासनगर : ( Ulhasnagar ) ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल फोनचा तपास करून पोलिसांनी जवळपास ३८ मोबाईल जप्त केल्या असून त्यापैकी २७ मोबाईल फोन मोबाईलच्या मूळ मालकांना हस्तांतर करण्याचा कार्यक्रम उल्हासनगर पोलिसांनी आयोजित केला होता. गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल फोन आपल्याला पोलिसांनी करवी परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांचे आभार प्रकट केले आहे.
 
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
 
 
या प्रसंगी, चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन मालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. एकूण ३८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले, त्यापैकी २७ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. परत केलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे २,७५,००० इतकी आहे. या प्रयत्नात पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी विशेष भूमिका बजावली. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये चोरीला गेलेले, हरवलेले किंवा जप्त केलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
 
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, जर तुमचा मोबाईल फोन चोरीला गेला किंवा हरवला तर घाबरू नका. ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात जा आणि तक्रार दाखल करा. तसेच, सिम कार्ड नंबर आणि आयएमईआय नंबर सुरक्षित ठेवा, ज्यामुळे ट्रेसिंगमध्ये मदत होईल.