Mamta Kulkarni : "दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही! त्यांनं कोणताही बॉम्बस्फोट..."; ममता कुलकर्णींचं वादग्रस्त विधान

30 Oct 2025 16:19:07
Mamta Kulkarni

 
मुंबई : (Mamta Kulkarni) बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी "दाऊद इब्राहिम हा काही दहशतवादी नाही", असे खळबळजनक विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. 
ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) नेमकं काय म्हणाल्या ?

ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) म्हणाल्या, "खरं तर माझा दाऊद इब्राहिमशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. माझं त्याच्याशी काही देणंघेणं नाही. जर तुम्ही पाहिलं तर त्याने देशात कोणताही बॉम्बस्फोट घडवला नाही. तसंच त्याने कोणतेही देशविरोधी कृत्य केलेले नव्हते. जेव्हा जेव्हा दाऊदचं नाव घेतलं जातं तेव्हा माझंही नाव जोडलं जातं, त्याने कधीच मुंबईत बॉम्बब्लास्ट घडवून आणलेला नाही. तुम्ही कधी हे ऐकलं तरी आहे का?, खरं तर या सगळ्यात दाऊदचे नाव कधीच नव्हते आणि मी कधीच दाऊदला भेटलेही नाही. राजकारणी लोकांनी आणि मीडियाने दाऊदला चुकीच्या पद्धतीने सगळ्यांसमोर आणले आहे."
 
हेही वाचा :  BMC Elections : उद्धव ठाकरेंच्या पक्षात मोठी उलथापालथ; ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना उमेदवारी नाही, पेडणेकरांचाही पत्ता कट?

 
ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) या एकेकाळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा 'खास' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोटा राजनच्या प्रेयसी होत्या, त्यामुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवता आलं, असं आजही म्हटलं जातं. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विक्रम गोस्वामी याच्यासोबत त्यांनी लग्न केलं. कालांतराने गोस्वामीला अटक झाली. यात देखील दाऊदचा हात असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान याच वर्षी महाकुंभमेळा सुरू असताना, ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला असून, 'माई ममता नंद गिरी' या नावाने त्या आयुष्य जगत आहेत.
 

 
Powered By Sangraha 9.0