_202510031850098440_H@@IGHT_360_W@@IDTH_696.jpg)
चेन्नई : संघ शताब्दी निमित्त देशभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजयादशमी उत्सव संपन्न झाले. शताब्दी वर्ष असल्याने स्वयंसेवक सुद्धा मोठ्या संख्येने संपूर्ण गणवेशात संघस्थानी उपस्थित होते. गुरुवारी चेन्नई येथे पोलिसांनी संघाच्या ३९ स्वयंसेवकांना ताब्यात घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना चेन्नईच्या पोरूर भागात घडली. पोलिसांच्या मते, या कार्यकर्त्यांवर एका सरकारी शाळेत परवानगीशिवाय पूजा आणि विशेष 'शाखा' प्रशिक्षण आयोजित केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, ३९ संघस्वयंसेवकांनी पूर्वपरवानगीशिवाय अय्यप्पनथंगल सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरु पूजा आणि विशेष शाखा प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. हा कार्यक्रम संघ शताब्दी वर्षानिमित्त आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी आरोप केला की, शासकीय शाळेच्या आवारात हा कार्यक्रम नियमांचे उल्लंघन करून आयोजित करण्यात आला कारण यासाठी कोणतीही अधिकृत मंजुरी घेण्यात आलेली नव्हती.
भाजप नेत्या तमिळिसाई सुंदरराजन यांनी चेन्नई पोलिसांच्या या कारवाई विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की पोलिसांनी विजयादशमीच्या दिवशी आणि विशेषता संघ शताब्दीच्या दिवशी संघाच्या कार्यकर्त्यांना अटक केली, जे पूर्णतः चूकीचे आहे. त्यांना तात्काळ सोडण्यात यावे. ५०–६० कार्यकर्ते मैदानावर दसऱ्यानिमित्त पूजन करत असताना अचानक पोलिसांनी त्यांना अटक केली. राज्य सरकार गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून संघ स्वयंसेवकांना अन्याय्यपणे लक्ष्य करत आहेत.