एफ – १६सह पाकचे ४ ते ५ लढाऊ विमाने उध्वस्त, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकचा कणा मोडला – वायुसेनाप्रमुख

03 Oct 2025 19:16:04

Air Chief Marshel
 
 

नवी दिल्ली : वायुसेना प्रमुख Air Chief Marshel अमरप्रीत सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या दाव्यांना निर्बंधित करत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे ४–५ फाइटर जेट उध्वस्त झाले; त्यात अत्याधुनिक एफ – १६ समाविष्ट असल्याचे ते म्हणाले.
 
 
वायुसेनाप्रमुख सिंह म्हणाले, पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानला भारी किंमत चुकवावी लागली. ऑपरेशन सिंदूरला इतिहासात स्मरणात ठेवले जाईल. आम्ही तीन ते चार दिवसांत कारवाई पूर्ण केली. जगाने भारताकडून शिकावे की युद्ध कसे संपवता येते. त्यांनी पुढे सांगितले की भारतीय सैन्याने पाकिस्तानी सीमेमध्ये २०० किमीपर्यंत हल्ला यशस्वी केवा आणि भू-आधारित मिसाइल अत्यंत अचूक ठरल्या. विशेष म्हणजे कारवाईत पाकिस्तानचे नागरी नुकसान झाले नाही.
 
 
त्यांनी अधोरेखित केले की भारतीय हवाई दलाने ४–५ फाइटर जेट उध्वस्त केले असून त्यात प्रामुख्याने एफ – १६ समाविष्ट आहे. गुप्तचर अहवालानुसार पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र प्रणालीचेही मोठे नुकसान झाले; चार रडार सिस्टीम्स, दोन कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्स आणि अनेक एअरफिल्ड्सचे नुकसान झाले आहे. तसेच हँगर्समधील काही सी – १३० विमानेही नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पाकिस्तानाच्या काही दाव्यांना ‘‘मनोरंजक कथा’’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली आणि पुढे म्हणाले की जर पुढे पाकिस्तानाने पुन्हा आगळीक केली तर त्यांना याहून अधिक नुकसान सहन करावे लागेल, असाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
Powered By Sangraha 9.0