
मुंबई : (Ladki Bahin Yojana E-KYC) महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"द्वारे दरमहा पात्र लाभार्थी महिलांना १५०० रूपये दिले जातात. मात्र, या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E-KYC) बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत, पात्र माहिलांना पुढील काही दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी (Ladki Bahin Yojana E-KYC) करावी लागणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पात्र माहिलांना ई-केवायसी प्रक्रिया करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कि, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते."
हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला, त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E-KYC) प्रक्रिया कशी करावी?
- मुखपृष्ठावर दिसणाऱ्या e-KYC या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये अर्जदाराने स्वतःचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा. नंतर आधार पडताळणीसाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटीपी प्रविष्ट करून Submit वर क्लिक करा.
- प्रणाली प्रथम तपासेल की, अर्जदाराची ई-केवायसी आधीच पूर्ण आहे की नाही.
- जर ई-केवायसी आधीच केली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- जर e-KYC केलेली नसेल, तर अर्जदाराचा आधार क्रमांक पात्र लाभार्थी यादीत आहे का, हे तपासले जाईल.
- जर अर्जदार पात्र यादीत असेल, तर पुढील टप्पा सुरू होईल.
- यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून, संमती दर्शवावी आणि Send OTP वर क्लिक
- करावे. संबंधित मोबाईलवर आलेला ओटीपी भरून Submit करावे.
- त्यानंतर लाभार्थ्याने आपला जात प्रवर्ग निवडावा आणि पुढील अटी स्वीकाराव्या
- माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभाग/मंडळ/उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा भारत/राज्य शासनात कायम नोकरीवर नाही तसेच कोणालाही निवृत्ती वेतन मिळत नाही.
- माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
- वरील अटी मान्य करून चेकबॉक्स सिलेक्ट करावा आणि Submit क्लिक करावे.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर संदेश दिसेल, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.”