मुंबई : ( Aditi Tatkare ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनांसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा १८ सप्टेंबर पासून दोन महिन्याच्या कालावधी करीता उपलब्ध करण्यात आली आहे. ई-केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रकिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी."
हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला, त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती
ई-केवायसीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ
"ई-केवायसीच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ असून महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पुर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी १८ नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी," असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले.