मुंबई : (Montha Cyclone Alert) पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या 'मोंथा' चक्रीवादळाने मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी तीव्र रूप धारण केले आहे. त्यामुळे दक्षिण ओडिशाच्या आठ जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. त्याबरोबरच सध्याची परिस्थिती पहाता आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला धडकणाऱ्या 'मोंथा' चक्रीवादळाचा (Montha Cyclone Alert) परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवस राज्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात पुढील काही तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : Maharashtra Cabinet decision : विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला सरकारची मान्यता, जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ 'मोंथा' (Montha Cyclone Alert) गेल्या सहा तासांत ताशी १५ किमी वेगाने उत्तरेकडून वायव्येकडे सरकले आहे आणि मंगळवारी सकाळी ५.३० वाजता तीव्र चक्रीवादळ वादळात रूपांतरित झाले. परिस्थिती लक्षात घेता, ओडिशा सरकारने मलकानगिरी, कोरापूट, रायगड, गजपती, गंजम, नबरंगपूर, कालाहांडी आणि कंधमाळ या आठ जिल्ह्यांमधील सखल भागातून आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या डोंगराळ भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. त्यासोबतच, एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन सेवेच्या ५,००० हून अधिक कर्मचारी असलेली १४० बचाव पथके तैनात केली आहेत.
हे वाचलात का ? : Gangaram Gavankar : मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'मोंथा' चक्रीवादळाचा (Montha Cyclone Alert) सर्वाधिक फटका हा आंध्र प्रदेशला बसला आहे. 'मोंथा' अतिशय वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारी भागाकडे सरकत असल्यामुळे, येथील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय नागरिकांना समुद्रात जाण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मोंथामुळे (Montha Cyclone Alert) आंध्र प्रदेशमधील रेल्वे आणि विमान सेवा तात्पुरती रद्द करत, सरकारकडून चक्रीवादळाचा सामना करण्याची तयारी सुरू आहे.